TRENDING:

पुण्यातील लोकांसोबत मोठं कांड, कोट्यवधी रूपये घेऊन मुंबईत लपला सिद्धेश, वर्षभर वाचला पण शेवटी कर्माचं फळ मिळालंच

Last Updated:

गुन्हा दाखल झाल्यापासून सिद्धेश काळे वारंवार आपले वास्तव्य बदलून पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तो नवी मुंबईत असल्याची खात्री केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सामान्य नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशाच एका घटनेत लोकांची तब्बल २ कोटी ९४ लाख ६३ हजार ८०१ रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार सिद्धेश मनोज काळे याला घोडेगाव पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला नवी मुंबई परिसरातून फिल्मी स्टाईलने जेरबंद करण्यात आले.
सिद्धेश मनोज काळे याला घोडेगाव पोलिसांनी अखेर अटक केली
सिद्धेश मनोज काळे याला घोडेगाव पोलिसांनी अखेर अटक केली
advertisement

नेमकी फसवणूक कशी केली?

आरोपी सिद्धेश काळे (रा. कोलदरे) याने त्याचे साथीदार गणेश दत्तात्रय गव्हाणे आणि राहुल दिलीप काळे यांच्या मदतीने 'इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड' या नामांकित कंपनीच्या नावाखाली गुंतवणुकीचे जाळे विणले होते. वार्षिक ३० ते ४० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांनी आंबेगाव परिसरातील अनेक गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. त्यानंतर परतावा न देता या रक्कमेचा अपहार केला.

advertisement

वर्षभराच्या लपाछपीनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गुन्हा दाखल झाल्यापासून सिद्धेश काळे वारंवार आपले वास्तव्य बदलून पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तो नवी मुंबईत असल्याची खात्री केली. तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर 'महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण' (MPID) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

advertisement

फसवणूक झालेल्यांना पोलिसांचे आवाहन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अजबच! महाराष्ट्रात इथं आहे ‘नवरा-नवरी’चं मंदिर, नवसासाठी होते गर्दी, पण 'ते' गूढ आजही कायम, Video
सर्व पहा

या प्रकरणात आणखी अनेक नागरिक फसवले गेले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी भीती न बाळगता घोडेगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी केले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुंतवणुकीच्या नावाखाली चालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील लोकांसोबत मोठं कांड, कोट्यवधी रूपये घेऊन मुंबईत लपला सिद्धेश, वर्षभर वाचला पण शेवटी कर्माचं फळ मिळालंच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल