TRENDING:

सावधान! PMPML मध्ये शेजारी बसलेल्या महिलेनं उलटी आल्याचं सांगितलं अन् क्षणात मोठं कांड, दुसरीनं पळतच गाठलं पोलीस ठाणं

Last Updated:

बस वैदुवाडी परिसरात आली असता, त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका अनोळखी महिलेने तिला 'उलटी' येत असल्याची बतावणी केली. यावेळी तिने तक्रारदार महिलेला जोरात धक्का दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होण्याच्या घटना नवीन नाहीत, मात्र आता चोरट्यांनी चोरीसाठी अजब पद्धत शोधली आहे. यात 'उलटी' आल्याचे नाटक करून प्रवाशांचे लक्ष विचलित करण्याची नवी शक्कल चोरट्यांनी लढवली आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ३० मार्च रोजी सकाळी हडपसर ते चिंचवड या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ६ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
PMPML मधील महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने लंपास (प्रतिकात्मक फोटो)
PMPML मधील महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने लंपास (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमका प्रकार काय?

तक्रारदार महिला ही धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील रहिवासी असून, त्या कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. त्या हडपसर गाडीतळ येथून चिंचवडला जाणाऱ्या बसमध्ये चढल्या. बस वैदुवाडी परिसरात आली असता, त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका अनोळखी महिलेने तिला 'उलटी' येत असल्याची बतावणी केली. यावेळी तिने तक्रारदार महिलेला जोरात धक्का दिला.

advertisement

लक्ष विचलित होताच 'गेम'

मळमळत असल्याचा बहाणा करत या चोरट्या महिलेने तक्रारदार महिलेचे लक्ष विचलित केले. या सगळ्या गडबडीत तक्रारदार महिलेचे दुर्लक्ष झाल्याची संधी साधून चोरट्या महिलेने त्यांच्या पिशवीतील दागिन्यांचं पाकीट लंपास केलं. बसमधून उतरल्यानंतर पिशवी तपासली असता, दागिने चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात आले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भक्ताला हनुमानाने दिला तो आशिर्वाद अन् 400 वर्षांपूर्वी स्थापन झालं 'सुपारी मंदिर', आख्ययिका माहितीये का?
सर्व पहा

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक इनामदार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित चोरट्या महिलेचा शोध सुरू केला आहे. मात्र, सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करता सावध राहाणं आणि आपल्या वस्तूंची काळजी घेणं किती गरजेचं आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
सावधान! PMPML मध्ये शेजारी बसलेल्या महिलेनं उलटी आल्याचं सांगितलं अन् क्षणात मोठं कांड, दुसरीनं पळतच गाठलं पोलीस ठाणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल