चांगला स्पर्श म्हणजे काय?
जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला स्पर्श करतो आणि तेव्हा तुम्हाला त्यातून प्रेमाची भावना कळते किंवा खूप चांगले वाटते किंवा त्या स्पर्शाने सुरक्षित वाटते. तर अशा स्पर्शाला चांगला स्पर्श म्हणतात. ही गोष्ट तुम्ही मुलांना समजावून सांगितली पाहिजे आणि वेळ पडली तर ते स्पर्श त्यांना करून दाखवा. कसे की प्रेमाने मिठी मारणे, मायेने किस करणे, असं उमा पाटील सांगतात.
advertisement
या गोष्टीच्या कमतरतेमुळे तुटतात शरीरातील नसा, रक्त बदलू लागते पाण्यात! वेळीच व्हा सावध
वाईट स्पर्श म्हणजे काय?
वाईट स्पर्श हा आधीच मुलांना कळणं फार महत्वाचं असतं. आपल्या प्रायव्हेट बॉडी पार्टसना केल्या जाणाऱ्या स्पर्शाबद्दल त्यांना प्रामुख्याने सांगा. काही विशिष्ट अवयव असतात ज्यांना चांगला स्पर्श करणारा व्यक्ती कधीच टच करणार नाही. अशा अवयवांबाबत मुलांना विशेष माहिती द्या. अगदी सखोल माहिती देण्यासाठीही पालकांनी लाज बाळगू नका, असं उमा पाटील सांगतात.
इन्सुलिन जास्त असणेही धोकादायक, मधुमेहासोबत याचे कॉम्बिनेशन घातक! दुर्लक्ष टाळा
अनेकदा आपण लहान मुलांना थेट अशा गोष्टी सांगू शकत नाही, अशा वेळी हळूहळू एक एक गोष्ट त्यांना सांगावी. जमल्यास एखाद्या चित्रपटाचा वा शैक्षणिक व्हिडिओचा आधार घ्यावा. जेव्हा पालक आणि मुल यांच्यातील नाते घट्ट होईल तेव्हाच अशा लैंगिक शोषणाला आळा बसेल. कारण अनेकदा लहान मुलांचे आपल्या पालकांशीच नाते नीट असते अशावेळी ही गोष्ट कोणाला सांगावी हे त्यांना कळत नाही. त्यांनी प्रत्येक गोष्ट शेअर करावी असे वाटत असेल तर पहिले नाते अधिक घट्ट करा, अशी माहिती उमा पाटील यांनी दिलीये .





