पुण्यात शरद पवारांनी शब्द फिरवला; चर्चा केली पुतण्याशी, पण आघाडी काँग्रेसशी; अजितदादांचा मोठा गेम

Last Updated:

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोण कुणाबरोबर चाललंय? या संभ्रमात पुणेकर मतदार सध्या आहेत.

News18
News18
पुणे :  पुण्यात नेमकं चाललंय काय? हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादीत v हालचाली. कारण, सोबत येणार येणार म्हणत, दोन्ही राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला. पण, आता हाच दुरावा पुण्यात महाविकास आघाडीच्या एकोप्याचं कारण ठरण्याची चिन्ह आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोण कुणाबरोबर चाललंय? या संभ्रमात पुणेकर मतदार सध्या आहेत. मागील आठवडाभरात ज्या वेगानं घडामोडी घडल्या आणि आता जे चित्र समोर येतंय, ते पूर्णपणे बदलले आहे. कारण, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून बरीच खलबतं झाली. जागावाटपासाठीच्या बैठकीत चांगलीच घासाघीस देखील झाली होती.
पुण्यात एकत्र निवडणूक लढण्याबाबत शुक्रवारी रात्रीतूनच निर्णय होईल असं बोललं जात असतानात अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चेसाठी पोहोचले. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे काकांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. तर दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.
advertisement

पुण्यात नेमकं कोण कोणासोबत आघाडी करणार?

त्यामुळं पुण्यात नेमकं कोण कोणासोबत आघाडी करणार? या प्रश्नाचं गूढ शनिवारी दुपारपर्यंत कायम होतं. काका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्या तऱ्हेनं अजित पवारांना चेकमेट करत, महाविकास आघाडीच्या मित्रांशी हातमिळवणी केली, ज्यावरुन अजित पवारांनाही पत्रकारांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं, हे कळत नव्हतं. अजित पवारांची उद्विग्नतेतून जे संकेत मिळते होते, तेच घडलंय. पवारांचे जे नेते अजित पवारांसोबत चर्चा सुरू असल्याचं सांगत होते, त्याच अंकुश काकडेंनी शनिवारी दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट करत, पुण्यात मविआ एकत्र लढणार असल्याचं जाहीर करून टाकलं.
advertisement

राष्ट्रवादीचं पुण्यात बिनसलं पण पिंपरीत जुळलं

सायंकाळपर्यंत पुण्यातील मविआचे जागावाटपही ठरल्याची माहिती मिळत होती. त्यामुळं पुण्यात पवार काका-पुतणे विरोधात लढण्याबाबत स्पष्ट संकेत मिळाले. तिकडे पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे भाजपला आव्हान देण्याची दाट शक्यता आहे. कारण, पिंपरी- चिंचवडसंदर्भात अजित पवार आणि शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली. अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनीही जिजाई निवासस्थानी अजित पवारांची भेट घेतलेली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अजित पवार पिंपरीचिंचवडमध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आणि पुन्हा एकदा शनिवारी अमोल कोल्हेंसोबत बैठक केली. त्यामुळं पुण्यात बिनसलं असलं, तरी पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र येणार, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.
advertisement

पुण्यात तिरंगी सामना होण्याची शक्यता

एकंदरीतच, पुणे जिल्ह्यात भाजपविरोधात एकत्र येण्याच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू होत्या.. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं दिसतंय.पण, पुणे महापालिकेत मात्र काकांच्या पक्षाला कमी लेखण अजित पवारांच्या अंगलट आल्याचं दिसतंय. त्यामुळंच आता पुण्यात भाजप विरुद्ध अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी असा तिरंगी सामना होण्याची चिन्ह आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात शरद पवारांनी शब्द फिरवला; चर्चा केली पुतण्याशी, पण आघाडी काँग्रेसशी; अजितदादांचा मोठा गेम
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement