7 वर्ष बेरोजगार होता 'तारक मेहता'चा हा अभिनेता, आज चालवतोय 2 हॉटेल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
तारक मेहता या मालिकेत काम करणारा एक 60 वर्षांचा प्रसिद्ध अभिनेता. ही मालिका मिळण्याआधी तो 7 वर्ष बेरोजगार होता. पण आज त्याची दोन मोठी हॉटेल्स आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो 15 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या वर्षात अनेक कलाकारांनी हा शो सोडला. त्यातील बऱ्याच कलाकारांना बाहेर चांगली काम मिळाली. अनेकजण आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. मात्र काही कलाकार आहेत ज्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो सोडला आणि त्यांच्या करिअर उतरती कळा लागली. त्यांना बाहेर कोणीही काम देत नाहीये.
advertisement
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील एक प्रसिद्ध अभिनेता शरद संकला. अब्दुल या रोलमध्ये शरद यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेते शरद संकला हे आता 60 वर्षांचे आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो मिळण्याआधी शरद हे सात वर्ष बेरोजगार होते. त्यांनी स्वत: एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं.
advertisement
बेरोजगारीमुळे माझा कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला. कामाचं महत्त्व मला कळलं आहे. माझी देवाजवळ प्रार्थना आहे कोणाच्याही आयुष्यात अशी वेळ येऊ नये. आयुष्यात प्रत्येकाला चांगले वाईट दिवस पाहावे लागता. सगळ्या नव्या कलाकारांना मी हे सांगेन की असा एक दिवस यावा लागतो. ते दिवस तुम्हाला कामाची किंमत सांगून जातात.
advertisement
advertisement
advertisement
गेल्या महिन्यात शरद संकला टीएमकेओसी कायमचे सोडत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे चाहते चिंतेत पडले होते. नंतर, अभिनेत्याने या अफवांना फेटाळून लावत ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं होतं. गोकुलधाम सोसायटीमधून अब्दुल बेपत्ता झाल्याचे एका एपिसोडमध्ये दाखवण्यात आले तेव्हा शरद संकला टीएमकेओसी सोडल्याच्या बातम्या समोर आल्या.
advertisement
शरद संकला यांनी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी कुठेही जात नाही आणि मी शोचा अविभाज्य भाग आहे. कथानक असे आहे की माझे पात्र सध्या शोमध्ये नाही, परंतु अब्दुल लवकरच परत येईल. हा कथेचा एक भाग आहे. हा एक खूप आवडता आणि दीर्घकाळ चालणारा शो आहे आणि मी अब्दुलची भूमिका करण्यासाठी ओळखला जातो; ही एक मोठी कामगिरी आहे. अब्दुलची भूमिका साकारल्यानंतर माझे आयुष्य बदलले आहे. मी शो का सोडेन? मी सोडण्याचा विचारही करू शकत नाही."
advertisement











