Mangesh Kalokhe Case: मंगेश काळोखे हत्येप्रकरणी गंभीर आरोप, सुनील तटकरे कर्जतमध्ये पोहोचले, पहिली प्रतिक्रिया
- Published by:Sachin S
Last Updated:
काळोखे यांचा हत्याकांडाची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसआयटी मागणी करणार आहोत. शिवाय
रायगड: ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये रायगडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यामुळे वातावरण तापलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या जिल्हाप्रमुखाला अटक करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही गंभीर आरोप केले आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस सुनील तटकरे हे कर्जतमध्ये पोहोचले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
रायगडच्या खोपोली मधील मंगेश काळोखे यांच्या हत्याप्रकरणी राष्ट्रवादीवर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप करत या मागचा आका सुतारवाडीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुनील तटकरे यांनी कर्जतमध्ये आज पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. "काळोखे यांचा हत्याकांडाची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसआयटी मागणी करणार आहोत. शिवाय या हत्येच्या घटनेनंतर काय आहे हे सर्व बाहेर येईल, तोपर्यंत सगळ्यांनी शांतता आणि संयम बाळगावा", असं आवाहन सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
advertisement
तसंच, या प्रकरणात मी जाहीरपणे काही बोलू इच्छित नाही. पण शांतता बाळगा. अनेक वेळा शांततेत राहिल्यामुळे सत्य हे समोर येतं. त्यामुळे अत्यातायी पणे बोलण्याची घाई नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. इथं जे काही सुरू आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवलं आहे. त्यामुळे भाष्य करू इच्छित नाही. कारण सत्य हे सत्य आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहणं माझं काम आहे. तपासातून सगळं काही बाहेर येईल' असंही तटकरे म्हणाले.
advertisement
शिवसेनेच्या आमदारांनी काय केला होता आरोप
view comments" या प्रकरणात सुनील तटकरे हे आका आहेत. बीडमध्ये जे घडलं तेच रायगडमध्ये रक्तरंजीत राजकारण घडत आहे. त्यांना सत्येचा माज आहे. राष्ट्रवादीकडून मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चुकीचे वक्तव्य करत आहे. एफआयआरमध्ये सुधाकर घारे याचं नाव आहे. पण, तटकरे हे सुधाकर घारे याला निर्दोष असल्याचं सांगत आहे. कोणत्याही प्रकाराचा तपास झाला नाही. पोलिसांनी अजून नीट तपास सुरू केला नाही. तरी सुनील तटकरे हे सुधाकर घारे हा निर्दोष असल्याचं सांगत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर यांचा दबाव आहे. सुनील तटकरे फोन करत आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला.
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mangesh Kalokhe Case: मंगेश काळोखे हत्येप्रकरणी गंभीर आरोप, सुनील तटकरे कर्जतमध्ये पोहोचले, पहिली प्रतिक्रिया











