थर्टीफस्टला चकली कशाला विकत घेताय? फक्त 5 मिनिटामध्ये घरीच बनवा, रेसिपीचा Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
सध्याला सोशल मीडियावरती मसाला चकलीची रेसिपी खूप व्हायरल होत आहे. तर ती मसाला चकली घरी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत. ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होते.
छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर दररोज नवीन नवीन गोष्टीचा ट्रेंड असतो. काही ट्रेंड आपण हे हसून बघतो आणि काहींकडे आपण दुर्लक्ष करतो पण त्या मधले काही जे ट्रेंड असतात ते बघून आपल्याला देखील ते करण्याची इच्छा होते आणि त्याचा मोह आपल्याला आवरत नाही. त्यापैकीच एक म्हणजे सध्याला सोशल मीडियावरती मसाला चकलीची रेसिपी खूप व्हायरल होत आहे. तर ती मसाला चकली घरी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत. ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होते.
4 ते 5 चकली, 7 ते 8 खजूर, एक ते दीड चमचा लाल तिखट, एक चमचाभर लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी एवढं साहित्य तुम्हाला चकलीसाठी लागतं. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर टाकून घ्यायचे त्यामध्ये तिखट टाकायचं. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं लिंबाचा रस टाकायचा आणि पाणी टाकून घ्यायचं. हे सर्व साठलेलं साहित्य एकदम बारीक रित्या मिक्सरमधून काढून. एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे, चटणी तयार आहे.
advertisement
एका मोठ्या बाऊलमध्ये चकली टाकून घ्यायची आणि त्यावरून जी आपण चटणी केलेली आहे ती टाकून घ्यायची सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं. चटणी जी आहे ती पूर्णपणे आपल्या चकल्या आहेत त्यांना लागली पाहिजे म्हणजे चांगलं कोटिंग झालं पाहिजे चटणीच जेणेकरून चव चांगली. आणि जी मसाला चकली आहे ती अशा सोप्या पद्धतीने मोजून पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होते. तर तुम्ही घरी देखील ही चकली नक्की ट्राय करा तुम्हाला देखील नक्कीच अशी आवडेल.
Location :
Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
थर्टीफस्टला चकली कशाला विकत घेताय? फक्त 5 मिनिटामध्ये घरीच बनवा, रेसिपीचा Video








