TRENDING:

Pune Metro: पुणेकर प्रवाशांनो, इकडे लक्ष द्या! उद्यापासून पुणे मेट्रोमध्ये होणार महत्त्वाचा बदल, तिकीट आता...

Last Updated:

पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून मेट्रो स्टेशनवरील तिकिट तपासणीच्या गेटमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे मेट्रो प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून अर्थात 3 मार्चपासून मेट्रो स्टेशनवरील तिकिट तपासणीच्या गेटमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनो प्रवास करण्यापूर्वी एकदा आवश्य ही बातमी वाचा. पूर्वी मेट्रो स्थानकांवरील तिकीट तपासणीचे गेट्स चालूच राहत होते. परंतू आता हे गेट्स उघडे राहणार नाहीयेत. आता हे गेट्स बंद होणार आहेत. नेमकं कशा पद्धतीने मेट्रो रेल्वे स्थानकावर नवीन बदल केला जाणार आहे, जाणून घेऊया...
important news for pune metro passengers from tomorrow there will be important changes in the ticket inspection gates at the metro station
important news for pune metro passengers from tomorrow there will be important changes in the ticket inspection gates at the metro station
advertisement

मेट्रो स्टेशनमध्ये काय बदलणार?

पुणे मेट्रो स्टेशनच्या तिकिट तपासणीच्या गेटमध्ये उद्यापासून म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवसापासून बदल होणार आहे. पूर्वी मेट्रो स्टेशनवरील तिकिट तपासणीचे गेट प्रवेश करताना आणि बाहेर पडताना चालूच राहायचे. परंतू आता हे गेट्स मेट्रो स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना असणारे गेट्स आधीपासून बंद असतील आणि तुम्ही तिकीट स्कॅन केल्यावरच ते उघडतील. यामुळे कदाचित प्रवाशांची गफलत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदा प्रवास करण्यापूर्वी ही बातमी आवश्य वाचा. मेट्रो स्टेशनच्या बदलाची माहिती 'पुणे मेट्रो रेल'ने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केलेली आहे.

advertisement

'पुणे मेट्रो रेल'ने पोस्टमध्ये काय लिहिलंय?

"पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवरील तिकीट तपासणीच्या (AFC) गेटमध्ये बदल केला आहे. आता मेट्रो स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना असणारे गेट्स आधीपासून बंद असतील आणि तुम्ही तिकीट स्कॅन केल्यावरच ते उघडतील. हा बदल उद्या मंगळवार, दिनांक 03-03-2026 पासून अंमलात आणला जाणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोचे ॲटोमॅटिक फेअर कलेक्शन (AFC) गेट्स नेहमी उघडे असायचे. तिकीट स्कॅन केल्यावर हिरवा दिवा लागायचा आणि प्रवाशांना आत जाता येत असे, पण तिकीट नसताना किंवा चुकीचे तिकीट असल्यास हे फ्लॅप गेट्स बंद होत असत. पण आता पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांतील हे AFC गेट्स नेहमी बंद राहतील. जेव्हा प्रवासी आपले तिकीट किंवा कार्ड मशीनवर स्कॅन करतील, तेव्हाच हे दरवाजे उघडतील आणि प्रवाशांना आत जाता येईल."

advertisement

धुलिवंदनानिमित्त मेट्रो बंद असणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गरोदर महिलांना असाही मदतीचा हात, उचलला जातो वैद्यकीय खर्च, स्मितांचा उपक्रम
सर्व पहा

दरम्यान, उद्या (03 मार्च 2026) धुलिवंदनानिमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहील. तर दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरू राहील. याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी आणि त्या प्रमाणेच आपल्या मेट्रो प्रवासाचे नियोजन करावे, अशी माहिती पुणे मेट्रो रेलने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: पुणेकर प्रवाशांनो, इकडे लक्ष द्या! उद्यापासून पुणे मेट्रोमध्ये होणार महत्त्वाचा बदल, तिकीट आता...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल