पुणे: भारत- पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थितीत जगभरातून भारताला मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, भूकंपावेळी मदत करूनही पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. तुर्कीच्या सफरचंदांवर बॅन तुर्की म्हणत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत.
युद्धकाळात पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की देशाला व्यापारात धक्का द्यायची मोहीम पुण्यात सुरू झाली आहे. तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार घातल्याने इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे.
advertisement
तुर्कीकडून खरेदी बॅन
व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंड सफरचंदाला पसंती दिली आहे. जगभरातून विविध देशांकडून भारताला पाठींबा मिळत असताना तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवत तुर्की सफरचंदावर बहिष्कार घातला आहे. इराणचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर आपल्याकडे तुर्की सफरचंदाचा हंगाम चांगला चालतो. इतर देशातील सफरचंदापेक्षा तुर्की सफरचंद परवडते. यंदा उत्पादन कमी असले तरी यंदा भारत-पाकीस्तान युध्दजन्य परिस्थिीतीत तुर्कीने पाकिस्तानला पाठींबा दिला. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी तुर्कीकडून खरेदी बॅन केली असून व्यापाऱ्यांनी देशासाठी तुर्कीकडून खरेदी करणे टाळले आहे.
व्यापाऱ्यांचा बॅन तुर्की ट्रेंड
मार्केट यार्डात देशासह परदेशातून सफरचंदाची आवक होत असते. भारत-पाकिस्तान तणावामुळे परदेशातील सफरचंदाच्या व्यवहारा वरदेखील परिणाम झाला आहे. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानविरोधात भारतानं कठोर पावलं उचलण्याची मागणी केली जातेय. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीबद्दल व्यापाऱ्यांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवला आहे. तुर्कस्तानशी संबंधित कोणत्याही कंपनीला भारतात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देणे सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते त्यामुळे या कंपन्यांच्या ताबा भारतीय कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात येतेय. दुसरीकडे तुर्की व अजरबैजान राष्ट्राच्या पर्यटनावर बंदी टाकण्याचा निर्णय ट्रॅव्हल एजेंट असोशिएशन ऑफ इंडिया घेतला आहे. त्यामुळे पाकड्यांना पाठिशी घालणाऱ्या तुर्कींना मोठा दणका बसणार आहे
