चाहत्यांची तुफान गर्दी
केदार जाधव आपली निळ्या रंगाची BMW Z4 कार घेऊन स्वतः या जल्लोषात सहभागी होण्यासाठी FC रोडवर आला होता. त्याला पाहताच चाहत्यांनी एकच गर्दी केली आणि त्याच्या कारला चहूबाजूंनी घेरले. अनेक तरुण त्याच्या कारच्या बोनेटवर आणि दारावर चढून फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी धडपडताना दिसले. केदारनेही मोठ्या मनाने चाहत्यांच्या या प्रेमाचा स्वीकार केला आणि कारमध्ये बसूनच त्यांच्यासोबत विजयाचा आनंद साजरा केला.
advertisement
यावेळी माध्यमांशी बोलताना केदार जाधव म्हणाला की, "भारतीय टीमचा हा विजय खूप मोठा आहे. जेव्हा मी क्रिकेट खेळायचो, तेव्हा असे सेलिब्रेशन बाहेरून पाहायचो, पण आज मला स्वतः रस्त्यावर उतरून सर्व पुणेकरांसोबत आणि भारतीयांसोबत हा अनुभव घ्यायचा होता, म्हणून मी आज येथे आलो आहे".
केदार जाधवला अशा प्रकारे थेट रस्त्यावर पाहून पुणेकर भारावून गेले होते. चाहत्यांच्या गर्दीमुळे काही काळ या भागात वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांच्या मदतीने केदारची कार गर्दीतून बाहेर काढण्यात आली. या घटनेचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
