पुणे - खरंतर निसर्ग हा आपला मित्र असतो. निसर्गाची सर कशालाच नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे गरज निसर्गाशी मैत्री करण्याची, निसर्गाशी एकरूप होण्याची आहे. अशाच सुंदर निसर्गाशी मैत्री करून पक्ष्यांच्या गावी जायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
पक्ष्यांच्या गावी जाण्यासाठी तुम्हाला पुण्यातील भोर तालुक्यात यावं लागेल. पुण्यातील भोर तालुक्यातील पिसावरे हे गाव पक्ष्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी तीनही ऋतूत वेगवेगळे परदेशी पाहुणे तुम्हाला बघायला मिळतील. जलाशयाच्या आसपास वर्षभर फ्लेमिंगो, स्मॉल प्रतिनकॉल, ओपन बिल स्टोर्क, पेंटेड स्टोर्क आदी जवळपास 300 जातींचे पक्षी मुक्काम ठोकून असतात. त्यांना अनुभवणे, त्यांचे विभ्रम न्याहाळणे हा एक अलौकिक अनुभव असतो.
advertisement
पिसावरे गावातील लहानग्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण सर्व पक्षांना अचूक ओळखतात आणि त्याची नोंदही करून ठेवतात. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यांमध्ये या ठिकाणी वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. आतापर्यंत याठिकाणी जवळपास 192 पक्ष्यांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. त्यातील 40 प्रजाती या स्थलांतरीत प्रजाती आहेत.
मुंबईतील ही 7 ठिकाणं कोणती, जिथं मिळतात सर्वात भारी वडापाव, photos
यात भुरड्या मैना, स्टिप इगल (नेपाळी मैना) वाकटेल सारखे पक्षी देखील या गावात येतात. गावातील परिसर समृद्ध असून तो टिकवण्याची जबाबदारी आपली आहे, अशी माहिती गावातील संतोष दळवी यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
भोर तालुक्यातील परिसर जैविकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे. हा परिसर, नितळ निसर्ग न्याहाळायचा असेल तर या गावी नक्की येऊ शकतात. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने या पिसावरे गावाचे महत्त्व जोखून इथे पर्यटक स्नेही व्यवस्था उभारली, तर या गावाचे पक्षीजगत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहील, तसेच यंत्रात-तंत्रात अडकलेला माणूस निसर्गाशी जोडला राहील यात शंका नाही, अशा भावना व्यक्त केल्या जात आहे.