अशी राहिली मका आवक: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 16 हजार 698 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 4 हजार 50 क्विंटल सर्वाधिक मका आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1325 ते जास्तीत जास्त 2168 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल मक्यास सर्वाधिक 2450 रुपये भाव मिळाला.
advertisement
कांद्याची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 2लाख, 53 हजार 678 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख, 47 हजार 872 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 270 ते जास्तीत जास्त 1316 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 480 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1500 ते 2750 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच ठाणे मार्केटमध्ये 3 क्विंटल कांद्यांची सर्वात कमी आवक होऊन त्यास 900 रुपये बाजार भाव मिळाला.
सोयाबीन उत्पादकांची कोंडी: राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची 1 लाख, 18 हजार 984 क्विंटल एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 42 हजार 067 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3500 ते 4271 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 700 क्विंटल सोयाबीनला 3790 ते 4386 दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला.
सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सोयाबीनसाठी 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला; तरी शासकीय खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून अवघ्या 4400 रुपयांमध्ये सर्वाउत्तम दर्जाचे सोयाबीन लुटले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फरपट आणि पदरात तोटा कायम आहे.