बनावट लग्नाचा बनाव आणि ४ मुलांचे सत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तौसीफ निसार ठाणगे (वय ३८) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित तरुणीशी जवळीक साधली. तिचा विश्वास संपादन करून त्याने तिला लोणावळ्यातील पवनानगर येथील रिसॉर्टमध्ये नेले. तिथे तरुणीवर दबाव टाकून त्याने खोटे लग्न केले. मात्र, काही दिवसांनी पीडितेला धक्कादायक वास्तव समजले. तौसीफ हा आधीच विवाहित असून त्याला चार मुले आहेत.
advertisement
तौसीफचे काळे कृत्य उघड झाल्यावर त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. "तुला जर माझ्यासोबत राहायचे असेल, तर तुला हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारावा लागेल आणि बुरखा घालावा लागेल," अशी सक्ती त्याने केली. एवढ्यावरच न थांबता, या नराधमाने पीडितेच्या शिक्षणासाठी आलेले स्कॉलरशिपचे ४२ हजार रुपये देखील स्वतःच्या घशात घातले.
आपली फसवणूक आणि छळ होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तौसीफविरुद्ध फसवणूक आणि धर्मांतरासाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
