अरुण छबु सोनवणे (वय ४०, रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली असं या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सोनवणे यांच्या मुलाने आरोपींच्या नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहानंतर आरोपी अत्यंत संतप्त झाले होते. याच कारणावरुन राग डोक्यात धरून शनिवार (२२ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपींनी थेट अरुण सोनवणे यांचं घर गाठलं.
advertisement
सोनवणे यांना शिवीगाळ करत आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींपैकी शेखर चव्हाण याने अरुण सोनवणे यांच्या डोक्यात लोखंडी गजाने वार केला. या हल्ल्यात सोनवणे गंभीर जखमी झाले. सोनवणे यांचा मुलगा मध्यस्थी करण्यासाठी आल्यानंतर आरोपींनी त्यालाही मारहाण केली.
प्रेमासाठी कायपण! तरुणीनं स्वतःच्याच घरात केली दोनदा चोरी; वैतागलेल्या वडिलांनी धडाच शिकवला
आठ जणांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर लोणी काळभोर पोलिसांनी अरुण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि दहशत माजविण्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. राज दादा शितोळे, शेखर दिलीप चव्हाण, रोशन दिलीप चव्हाण, दिलीप पंडीत चव्हाण, आईनाबाई दिलीप चव्हाण, पूजा दिलीप चव्हाण, मनीषा दादा शितोळे, उज्ज्वला सावंत (सर्व रा. थेऊर, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक बिराजदार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रेमविवाहानंतर झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे थेऊर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
