प्रेमासाठी कायपण! तरुणीनं स्वतःच्याच घरात केली दोनदा चोरी; वैतागलेल्या वडिलांनी धडाच शिकवला
- Published by:Kiran Pharate
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
कॉलनीतील एका मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या मुलीने घरच्यांच्या विरोधामुळे थेट घरातूनच दोनदा चोरी केली.
छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या नादात स्वतःचंच घर उद्ध्वस्त करण्याइतकी टोकाची पावलं एका 19 वर्षांच्या मुलीने उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरातील हसूल परिसरात उघड झाली. कॉलनीतील एका मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या मुलीने घरच्यांच्या विरोधामुळे थेट घरातूनच दोनदा चोरी केली. पहिल्यांदा 11 लाखांची रोकड आणि नंतर सुमारे 2 तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन ती प्रियकरासोबत फरार झाली.
पहिल्या चुकीनंतर "लहान आहे" म्हणून तिला माफ करणाऱ्या आई-वडिलांचा संयम यावेळी मात्र सुटला आणि त्यांनी स्वतःच पोलिसांत तक्रार दाखल केली. होनाजीनगर परिसरातील या मुलीचे कॉलनीतीलच एका मुलाशी प्रेमसंबंध होते. दोन्ही घरांतून या नात्याला तीव्र विरोध झाल्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. घराबाहेर पडण्यासाठी पैसा लागणार म्हणून मुलीने पहिल्यांदा थेट घरातील 11 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. मात्र, बाहेर परिस्थिती प्रतिकूल ठरली आणि दोन्ही कुटुंबीयांच्या शोधमोहीमेच्या दरम्यानच त्यांनी चूक मान्य करत घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पालकांनी त्यांना समजावून सांगत माफही केलं.
advertisement
काही महिन्यांनंतर पुन्हा त्याच प्रेमीयुगुलानी घरातून परत पळून जाण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी घरात रोकड ठेवणं बंद केल्यानं यावेळी मुलीने सोनंच लंपास केलं. घरातील 2 तोळ्यांच्या दागिन्यांमध्ये 10 ग्रॅम आणि 3 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 1 ग्रॅमची बाळी आणि 5 ग्रॅमचा सोन्याचा कॉइन घेऊन ती प्रियकरासह पळून गेली. मुलीच्या सततच्या चुकीच्या वागण्याने संतापलेल्या आईने अखेर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चाही रंगली आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 24, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
प्रेमासाठी कायपण! तरुणीनं स्वतःच्याच घरात केली दोनदा चोरी; वैतागलेल्या वडिलांनी धडाच शिकवला


