TRENDING:

मुंडेंच्या हत्येचे गुपित 'त्या' बंगल्यात दडलंय, वाल्मिक कराडांच्या उल्लेखामुळे तपासाला नवी दिशा; दोन पोरं कोण?

Last Updated:

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : बीडमधील परळी येथे प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. आता या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचे देखील मुंडे खून प्रकरणात नाव समोर आले आहे. मुंडे याच्या हत्येला आता दोन वर्षे पूर्ण झाली असून यामध्ये खळबळजनक खुलासे केले जात आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुंडे यांच्या पत्नीने केली होती. तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोपही केले आहे. आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे.
News18
News18
advertisement

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकरणातील संशयित आरोपींची ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भावनिक आणि संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले की, माझे पती महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली होती. मात्र, एवढा काळ लोटूनही अद्याप एकाही आरोपीला निष्पन्न करता आलेले नाही. तपास आता अंतिम टप्प्यात असतानाही अद्याप ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

advertisement

संशयितांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येणार

दरम्यान एक फोन आल्यानंतर या प्रकरणाचा तपास काही काळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे आरोपींना फायदा झाला. मात्र, आता पुन्हा तपासाला गती देण्यात आली असून, कराड येथील एका बंगल्यावर नोकर म्हणून काम करणाऱ्या संशयितांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये दोघांची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आली असून, नार्को टेस्टमध्ये गुन्हा नेमका कशा पद्धतीने करण्यात आला, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे, असेही त्या म्हणाल्या.

advertisement

 एसआयटी स्थापन करून तपासाचे आदेश

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गोटया गीते हा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. गोटया गीतेचा या हत्याकांडामध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, तो सापडल्यास तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महादेव मुंडे यांची काही महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण परळी शहरात खळबळ उडाली होती. व्यापारी संघटना, स्थानिक नागरिक तसेच सामाजिक संघटनांनी या हत्येचा तीव्र निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने एसआयटी स्थापन करून तपासाचे आदेश दिले होते.

advertisement

  तपासाला वेग आला 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एकाच शेतात घ्या वेगवेगळी पिकं, सोपी पद्धत अन् उत्पन्नातही वाढ, असा हा फॉर्म्युला
सर्व पहा

दरम्यान आता  तपासाला वेग देण्यात आल्याने लवकरच खुनामागील कट उघडकीस येईल आणि दोषींना कठोर शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा मुंडे कुटुंबीयांसह परळीकर नागरिक व्यक्त करत आहेत. तपास यंत्रणांकडून या प्रकरणात पुढील काही दिवसांत महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
मुंडेंच्या हत्येचे गुपित 'त्या' बंगल्यात दडलंय, वाल्मिक कराडांच्या उल्लेखामुळे तपासाला नवी दिशा; दोन पोरं कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल