मुंबई : राज्यातील उष्णतेच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह कोकणातील बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक अशा सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान हे सातत्याने चढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची देखील शक्यता आहे. पाहुयात 9 मार्च रोजी राज्यातील हवामान कसं असेल.
advertisement
कोकण विभागातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा पुढील चार दिवसांसाठी देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल. पुणे शहरात कमाल तापमानाचा पारा 39 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर पुण्यातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे असेल. कोल्हापूरमध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल.
यवतमाळमध्ये दुर्मिळ जीवाला बॅगेत भरलं, गुजरातला विकण्याचा होता प्लॅन, पण जालन्यात पकडलं!
छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असेल. उत्तर महाराष्ट्रातही तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता असून किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर उपराजधानी नागपूरमध्ये ही कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असेल.





