मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमान मात्र लक्षणीयरीत्या वाढले आहे. मुंबईमध्ये 19 मार्च रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहील तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे असेल. पुण्यामध्ये मात्र उष्णतेचा कडाका कायम आहे. पुण्यात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. तर कोल्हापूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
उन्हाळ्यात माठातील पाणी प्यावं की फ्रीजमधील? शरिरावर कसा होतो परिणाम?
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसभर उन्हाचा कडाका जाणवणार असून सायंकाळच्या वेळी आकाश भरून येऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. संभाजीनगरमध्ये 19 मार्च रोजी कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. नाशिकमध्ये ढगाळ आकाशासह कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सर्वाधिक कमाल तापमान उपराजधानी नागपूरमध्ये राहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये ढगाळ आकाशासह कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे असेल.