TRENDING:

कोल्हापुरात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढला, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:

राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोल्हापूरमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ आकाशाबरोबरच हलक्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोल्हापूरमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ आकाशाबरोबरच हलक्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. मायानगरी मुंबईमध्ये मात्र उकाडा प्रचंड वाढला आहे. मुंबईतील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. तर किमान तापमान हे 21 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement

मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. पुणे शहरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहील. किमान तापमानात घट झाली असल्याने पुण्यामध्ये सकाळच्या वेळी थंडी जाणवत आहे. 

advertisement

कोरोनात नोकरी गेली, तरुणानं सुरु केला अनोखा व्यवसाय, आता कमाई चांगलीच

कोल्हापूरमध्ये मात्र ढगाळ आकाशाबरोबर हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. तर कोल्हापुरातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहील. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये मात्र निरभ्र आकाश राहील. 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

एकंदरीत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत असून काही शहरांमधील कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे.  तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे यासारख्या शहरांमध्ये सकाळच्या वेळी हिवाळ्यासारखी थंडी देखील जाणवत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
कोल्हापुरात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढला, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल