30 मार्चला राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव या सर्व जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमानात वाढ होऊन कमाल तापमान स्थिर असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर पुढील 2 दिवसांत मुंबईतील तापमानात अंशतः घट होऊन त्याठिकाणी दुपारी किंवा संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
advertisement
पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यात 30 मार्चला मुख्यतः निरभ्र आकाश राहून दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, पुढील दोन दिवसांत पुण्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 30 मार्चला तेथील तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील 24 तासांत दुपार किंवा सायंकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिकमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 30 मार्चला नाशिकमधील तापमानात अंशतः वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील 24 तासांत नाशिकमधील तापमानात वाढ होणार असून त्याठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
नागपूरमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 30 मार्चपासून पुढील 2 ते 3 दिवस नागपूरमधील तापमान स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे. 2 एप्रिलपासून नागपुरात जोरदार वाऱ्यांसह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील वातावरणात पुन्हा हवापालट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. काही भागांत पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी उन्हाळी पिकांची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.





