मुंबईमध्ये 20 एप्रिलला किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस इतके असून आकाश मुख्यतः निरभ्र असू शकतं. पुण्यातही हवामान कोरडे राहून किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण जाणवू शकतं. यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, शक्यतो थेट उन्हात जाणे टाळावे अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 एप्रिलला किमान तापमान 25 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस दरम्यान असून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्येही किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस असून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये मात्र अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसवर कायम राहू शकतं. पुढील 24 तासांत नागपूरात विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तापमान आणि पाऊस असे दुहेरी संकट विदर्भात दिसून येत आहे.
त्यासह, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विविध ठिकाणी उन्हाचा कहर सुरू असताना विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची व शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची काळजी घेणे आवश्यक आहे.





