मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम असून दुपारच्या वेळी तीव्र उष्णता सकाळच्या वेळी गारवा तर सायंकाळी उष्णता पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून थंड हवेमुळे तापमानामुळे वाढलेली उष्णता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. 7 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल पाहुयात.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. मुंबईत आतापर्यंत असलेले अल्हाददायक वातावरण आता उष्ण होणार आहे. पुणे शहरामध्ये सकाळच्या वेळी धुके पाहायला मिळत होतं आता मात्र पुण्यामध्ये 7 फेब्रुवारी रोजी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.
आता आली लाल ज्वारी, नवीन वाणाची निर्मिती, अशी करा लागवड Video
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसांपासून कमाल तापमान 33 अंशांच्या आसपास आहे. 7 फेब्रुवारी रोजी देखील मराठवाड्यात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस एवढे राहील तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहील. नाशिकमधील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय.
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट होणार आहे. 36 अंशापर्यंत वाढलेलं नागपूरचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे तर किमान तापमान देखील 17 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत पुढील काही दिवस संपूर्ण राज्यामध्ये कोरडे हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळणार आहे. तसेच उत्तरेकडून येत असलेल्या थंड हवेमुळे उष्णतेची तीव्रता कमी झाल्याचे पाहायला मिळतंय.