महिला दिनाच्या दिवशी राज्यात सर्वत्र मुख्यतः निरभ्र आकाश राहून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील तापमानात वाढ झाल्याने 8 मार्चसाठी मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईतील तापमानात पुढील 24 तासांत आणखी वाढ होऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
एका लग्नाची अनोखी गोष्ट, अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान
पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 8 मार्चला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील 24 तासांत पुण्यातील तापमानात देखील वाढ होऊन ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात सातत्याने चढ उतार सुरू आहे. 8 मार्चला तेथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील 24 तासांत छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
उन्हाळ्याच्या सुरवातीला नाशिकमधील तापमानात घट दिसून येत होती. त्यानंतर दिवसेंदिवस त्यात काहीशी वाढ बघायला मिळाली. आता त्यात बहुतांश वाढ होऊन नाशिकमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील काही दिवसांत नाशिकमधील तापमानात वाढ होऊन ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
नागपूरमधील तापमानात देखील आता वाढ झालेली दिसून येत आहे. 8 मार्चला नागपूरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत तेथील तापमानात वाढ होऊन 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलय.
मार्च महिन्यात राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे. काही भागांत रात्रीच्या वेळी काहीशी थंडी सुद्धा जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.





