12 मार्चला राज्यात सर्वत्र मुख्यतः निरभ्र आकाश राहून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईत मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. त्याचबरोबर मुंबईत 12 मार्चसाठी उष्णतेचा येलो अलर्ट सुद्धा जारी केलाय. त्यामुळे उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांत तापमानात घट होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून मिळाली आहे.
advertisement
तीन चटण्या अन् पापडी, मुंबई स्पेशल वडापावची चव आता जालन्यात, तरुण करतोय दिवसाला 5 हजारांची कमाई
पुण्यातील तापमानात 2 अंशांनी वाढ होऊन तेथील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 12 मार्चला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुण्यातील तापमान पुढील 3 दिवस स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यानंतर तेथील तापमानात घट बघायला मिळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी निरभ्र आकाश असू शकतं. पुढील काही दिवसांत तेथील तापमानात अंशतः घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
नाशिकमधील तापमानात वाढ होऊन तेथील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असू शकतं. 12 मार्चला नाशिकमधील तापमानात अंशतः वाढ बघायला मिळत आहे.
नागपूरमधील तापमानात देखील वाढ होऊन तेथील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 12 मार्चला नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. नागपूरमधील तापमानात अंशतः वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. 12 मार्चसाठी सुद्धा काही शहरांना उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.





