पुणे : पर्यावरण जनजागृती करत असताना प्लास्टिक किती घातक आहे, या विषयी आपण अनेक मोहिम राबवत असल्याचे ऐकतो. मात्र, तरीही त्याचा वापर काही कमी होत नाही. अशाच कचऱ्यात फेकून दिलेल्या प्लास्टिक बॉटल्सचा वापर करत पुण्यातील आर्किटेक्ट राजेंद्र इनामदार यांनी एक दोन हजार नव्हे तर तब्बल 85 हजार प्लास्टिक बॉटल्स वापरून स्वप्नातील घर तयार केले आहे.
advertisement
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरा गावात इनामदार यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर बांधले आहे. या घराला हाऊस ऑफ पेट बॉटल्स असे नावही त्यांनी दिले आहे. हे घर त्यांनी फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्सपासून साकारले आहे. संपूर्ण बॉटल्स या एक लिटर पाण्याच्या आहेत. हे घर पाहण्यासाठी आणि राहण्यासाठी बहुतांश लोक इथे येत असतात.
ते म्हणाले की, प्लास्टिकच्या बॉटल वापरुन घर बांधण्याची कल्पना ही रात्री झोपेमध्येच सुचली होती. आपण पाहतो की, प्लास्टिकच्या बॉटल्स फेकून दिलेल्या असतात. खडकवासलाच्या बाजूला पाहिले तर चौपाटी आहेत. तिथे लोक विविध पदार्थ खाल्यावर पाणी पिऊन बॉटल्स फेकून देतात. तसेच सिहंगड येथील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि पाणी पिऊन बॉटल्स टाकून देतात. ट्रेकिंगला गेले की, त्या बाटल्या पोत्यात घेऊन गोळा करून आणायच्या तर बऱ्याच वेळा कचरा कुंडीमध्ये उतरून बाटल्या गोळा करायचो. मी हे का करतो आहे, हे लोकांना कळत नव्हतं. तर सांगितलं की, लोक थम्सअप करायचे.
या 85 हजार बॉटल्समधल्या 4 हजार बॉटल्स या नातेवाईक मित्रांनी गोळा करून दिल्या. तर गरजेनुसार तीन हजार बॉटल्स या रेस्टोरंटमधून आणल्या. उर्वरित 77 ते 78 हजार बॉटल्स या मी स्वतः गोळा केल्या आहेत. 10 गुंठ्यामध्ये जागेमध्ये हे घर बांधले आहे. बॉटल्समध्ये क्रश सॅन्ड, पाणी आणि सिमेंट भरून ते बॉटल वापरण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मधक्रांतीसाठी अनुदान प्रस्ताव कसा आणि कुठे सादर करावा?, संपूर्ण माहिती, VIDEO
विटांचे घर जर आपण पाहिली तर त्याच्या तुलनेत या घराचे जीवनमान हे नक्कीच जास्त असे आहे. 2017 मध्ये बांधकाम करायला सुरुवात केली होती. तर 2021 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. टाकून दिलेल्या, ज्या रीसायकल करून वापर करू शकतो, अशा गोष्टींचा वापर यात करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करून जर घर बांधणी केली तर नक्कीच ते निसर्गाच्या दृष्टीने फायदेशीर होऊ शकते, अशी माहिती राजेंद्र इनामदार यांनी दिली.