मयत महिलेच्या पतीला आयोगाने 20 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 22 ऑक्टोबर 2008 पासून सहा टक्के व्याजाने, उपचारांसाठी 6 लाख रुपये आणि तक्रार खर्च म्हणून 50 हजार रुपये देण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
17 वर्षाहून अधिक काळ या केसची सुनावणी चालली. सुरुवातीला काही ना काही कारणाने सुनावणी लांबत गेली आणि त्यानंतर हे प्रकरण पुणे खंडपीठाकडे वर्ग झालं. यादरम्यान प्रशांत कुकडे आणि त्यांचे वकील अॅड. ज्ञानराज संत यांनी सातत्याने लढा सुरूच ठेवला आणि अखेर 17 वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला.
advertisement
कचरा वेचणाऱ्या महिलेचं आभाळाएवढं मोठं मन! सदाशिव पेठेत कचऱ्यात सापडले 10 लाख रूपये, अन् मग...
नेमकं काय घडलं?
या घटनेत 8 ऑगस्ट 2008 रोजी रूपाली कुकडे यांना प्रसूतीसाठी जीवनदीप मेडिकेअर सेंटर येथे डॉ. दीपलक्ष्मी रगडे यांच्याकडे दाखल केलं होतं. लेबर पेन सुरू झाल्यानंतर त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. तीन तास होऊनही त्या बाहेर आल्या नाहीत. यावेळी ऑपरेशनदरम्यान मोठा टॉवेल शरीरात राहिल्याने तो पुन्हा काढण्यात आला आणि पुन्हा एकदा टाके घालण्यात आले असल्याची माहिती नंतर नातेवाईकांना कळाली.
यासोबतच पाठीच्या कण्यातून दिलेली भूल अपुरी पडल्याने त्यांना पुन्हा पूर्ण भूल देण्यात आली. याचदरम्यान त्यांना कार्डियाक अरेस्ट आला. यासोबतच उपचारानंतरही योग्य देखरेख न मिळाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. महिलेला रत्ना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. नंतर रूपाली यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं.मात्र तोपर्यंत त्या कोमामध्ये गेल्या पावणेतीन वर्षांपेक्षाही जास्त काळ त्या कोमामध्ये होत्या. अखेर त्यांचं निधन झालं. यानंतर कुकडे यांनी राज्य ग्राहक आयोगात धाव घेतली आणि अखेर त्यांना न्याय मिळाला.
