प्रदीप सावंत असं जखमी झालेल्या 39 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. या गोळीबारानंतर त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पिस्तूल हाताळताना अचानक गोळी सुटल्यामुळे हा प्रकार घडला. घटनास्थळी दोनजण दारू पार्टी करायला गेले होते. यावेळी अनिल चव्हाण नावाच्या व्यक्तीने गावठी पिस्तूल आणलं होतं. दारु पित असताना आरोपी पिस्तूल हातळत होता. यावेळी अचानक चुकून गोळी सुटली. ज्यात प्रदीप गंभीर जखमी झाला.
advertisement
या अपघातानंतर सुरुवातीला जखमी प्रदीपने हा प्रकार अनावधानातून घडल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि मिळालेल्या पुराव्यांमुळे पिस्तूल हाताळणीची चूक उघडकीस आली आहे. याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करत अनिल चव्हाणला अटक केली आहे.
आरोपी चव्हाणकडे गावठी पिस्तूल कसं आलं, याची चौकशी पोलीस करत आहेत. बेकायदेशीर पिस्तूल आणणे आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर पिस्तूल हाताळणीसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.