एका मतदान केंद्रावरचा हा व्हिडीओ असल्याचा सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला समजावून सांगत आहे. तर दुसरीकडे, दत्ता भरणे हे ‘आज जाशील मी संध्याकाळी 6 वाजेनंतर मीच इथं आहे, मीच तुमच्या मदतीला असतो. बारामतीतलं कुणी येणार नाही’ असं म्हणत या तरुणाला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली आहे. मतदारांनी दत्ता मामांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून दत्तामामांनी व्हिडिओ मधून शिवीगाळ करत तुम्ही या ठिकाणाहून जा असं सांगत धमकावलं आहे. या व्हिडीओमधला तरुण हा कोण आहे. याची माहिती अद्याप समोर आली नाही.
advertisement
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दत्ता भरणे यांनी यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे. 'मी शिवी दिलीच नाही, ग्रामीण भाषेत बोललो, तो कार्यकर्ता पैसे वाटत होता. कार्यकर्त्यांमध्ये भांडण सुरू होतं. मी त्याला वाचवलं, भंडण सोडवलं आणि त्याला तिथून जायला सांगितलं' असं भरणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान भरणे यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्यांचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. याला देखील भरणे यांनी उत्तर दिलं. मी आयोगाला उत्तर देण्यास समर्थ असल्याचं भरणे यांनी म्हटलं आहे.