नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाचा निषेध करण्यासाठी टिळक रस्त्यावरील महाविद्यालयाजवळ एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार तिथे गेल्या होत्या. याच दरम्यान संतोष पंडित तिथे पोहोचला. यानंतर त्याने पत्रकारांवर आपला राग काढण्यास सुरुवात केली.
advertisement
कपड्यांवरून अश्लील कमेंट आणि चित्रीकरण
संतोष पंडितने केवळ आरडाओरडाच केला नाही, तर त्याने महिला पत्रकाराच्या अंगावरील कपड्यांवरून अत्यंत अर्वाच्य भाषेत आणि अश्लील टिप्पणी केली. तसेच, त्या महिला पत्रकाराने विरोध दर्शवूनही त्याने तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. या संतापजनक प्रकारानंतर संबंधित पत्रकाराने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संतोष पंडितवर विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले आणि पर्वती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रील बनवण्याच्या नादात सामाजिक भान विसरणाऱ्या या रीलस्टारला आता कायद्याचा दणका बसणार आहे.
