कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घायवळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाईचे आदेश दिले होते. तपासात घायवळने अहिल्यानगरमधून 'तत्काळ' पासपाेर्ट मिळवून 90 दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला प्रवास केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर घायवळ बंधूचे रोज नवे कारनामे उघड होत आहे. या सर्व प्रकरणावर घायवळ कुटुंबाने समोर येत पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे.
advertisement
निलेश घायवळची आई काय म्हणाली?
नीलेश घायवाळची आई कुसुम घायवळ म्हणाली, पोलीस सतत आमच्या घरी येतात अन् म्हणतात निलेश लंडनला पळून गेला. तो पळून गेला नाही, मी त्याला स्वत: त्याला पाठवलं आहे. निलेश लंडनला जाताना त्याची बायको, मुलगा सोबत होते. ते परदेशात जाताना मी त्यांना सोडायला गेले होते. खोटा व्हिजा वगैरे काही नाही, पुणे पोलीस खोटं बोलत आहे,असे निलेश घायवळची आई म्हणाली.
दोन्ही भावांना राजकारणी अडकवतात : कुसुम घायवळ
नीलेशला राजकारणात प्रवेश करायचा होता. दोन महिन्यावर ज्या निवडणुका आल्या आहेत. नगर जिल्ह्यातील सोनेगाव जिल्हा परिषदतून तो उभं राहणार होता, मात्र विरोधकांनी कट रचून त्यांना अडकवल्याचा दावा निलेश घायवाळच्या आई कुसुम घायवळ यांनी केला आहे. पुढे निलेशची आई म्हणाली, माझी मुलं सुधारण्याचा प्रयत्न करत होती. निलेशला राजकारणाचे वेड आहे. तो एका ठिकाणी नोकरी करतो, मी त्याची आई आहे, खोटं बोलणार नाही. मला दोन लेकर आहे, त्यांनी पळून जावं असं कोणात्या आईला वाटतं. दोन्ही भावांना राजकारणात उतरायचं होतं पण यामागे मोठं राजकारण आहे. माझे दोन्ही मुलं सरळ मार्गाने जगत होते. मात्र विरोधी पक्षातील लोक त्यांना जगून देत नाही.