पासपोर्टवर नावामध्ये गोंधळ करत पळून गेलेल्या घायवळचा आता बाजार उठण्याची चिन्ह दिसत आहेत. पुणे पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. निलेश घायवळ याच्या घरी छापेमारी केली. इतकंच नाहीतर घायवळ याचे कोथरूड परिसरातील ऑफिसही सील केले आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जून २०१८ ते मे २०२५ कालावधीत बळकवलेल्या फ्ल्ॅट प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी निलेश घायवाळ, सचिन घायवाळ, बापू कदम, चिक्या फाटक, मनिष माथवड, सागर चौधरी. माऊली तोंडे, निलेश शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
भाडे उकळण्याचा प्रकार
आरोपींनी इमारतीमध्ये बेकायदेशीर प्रवेश करुन फिर्यादी यांना निलेश घायवळ यांने पिस्तुल डोक्याला लावून त्यांच्या इमारतीमधील एकुण १० फ्लॅटवर बेकायदेशीरपणे खंडणीच्या स्वरुपात ताबा घेतला. बापू कदम हा बेकायदेशीरपणे ताब्यात असलेल्या फ्लॅटमधील भाडेकरूचे भाडे अनाधिकाराने घेत आणि निलेश घायवळ यास देत असल्याची तक्रार फिर्यादीने दिली होती.
निलेश घायवळला 90 दिवसानंतर अटक करणार का?
पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या विदेशात असून त्यांचे लोकेशन लंडन आहे अशी माहिती मिळाली होती. मात्र, तो लंडनमधून नसून दुसऱ्याच देखील असल्याचं समजतंय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलेश घायवळ सध्या स्विर्त्झंलंडमध्ये असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याला 90 दिवसांचा व्हिसा देखील मिळाला आहे. त्यामुळे आता निलेश घायवळला 90 दिवसानंतर अटक करणार का? असा सवाल विचारला जात आहे.
गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार
दरम्यान, शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार पोलिसांनी घेतला असून, त्यानुसार कठोर पावले उचलली जात आहेत. या गँगस्टरविरोधात तक्रार देणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची जवाबदारी पोलिसांकडून घेतली जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. त्यामुळे लोकांनी पुढं येऊन तक्रार द्यावी, अशी विनंती देखील पोलिसांकडून केली जात आहे. आंदेकर टोळीविरोधात खंडणीची तक्रार देणाऱ्यांसह अन्य तक्रारदारांना सुरक्षा पुरविण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.