गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात स्पा आणि लॉजिंगच्या नावाखाली बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू होता. या गैरप्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. सांगवी आणि हिंजवडी परिसरातील दोन स्पा सेंटरसह एका लॉजवर छापा टाकत संबंधित स्पा सेंटर आणि लॉजला एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे.
पैसे कमवायचे होते पण गमवले; MIDC मध्ये नोकरीचं आमिष, 47 तरुण-तरुणी अडकले जाळ्यात, शेवटी...
advertisement
दोन स्पा सेंटर्स आणि लॉजवर कारवाई
या कारवाईदरम्यान सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जी.एस. स्पा आणि ऑरा थाई स्पा, तसेच हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अतिथी लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी छापे टाकण्यात आले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने संशयित महिला तसेच व्यंकटेश कोदंडबानी, अभिजित लॉरेन्स, प्रवीण बळीराम असटकर, युवराज राजेंद्र पाटील आणि राहुल चव्हाण उर्फ अमित यांच्यावर संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार धार्मिक आणि शैक्षणिक ठिकाणी अवैधरित्या सुरू होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांनी या प्रकारातील संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सांगवीतील गांगर्डेनगर आणि पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटर्स तसेच हिंजवडीतील विनोदे वस्ती येथील लॉजमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू होता. या प्रकारची पोलिसांना खबर लागताच या प्रकरणाचा तपास करत संबंधित ठिकाणी छापे टाकत कडक कारवाई करण्यात आली.






