TRENDING:

PCMC Recruitment : थेट मुलाखतीतून नोकरीची संधी, पिंपरी चिंचवडमध्ये मेगा भरती, पात्रता काय?

Last Updated:

PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महापालिकेत 2025 साठी वैद्यकीय पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून 2025 या वर्षातील ही थेट मुलाखतीद्वारे वैद्यकीय पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची संधी आहे. चला तर नेमकं कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
pcmc recruitment 2025
pcmc recruitment 2025
advertisement

थेट मुलाखतीने 'कोणत्या' पदांसाठी करण्यात येणार भरती

पिंपरी चिंचवड महापालिकेत 'इंटेन्सिव्हिस्ट' या पदासाठी भरती होणार असून यासाठी एकूण 11 रिक्त जागा आहेत. मात्र ही निवड प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे MD किंवा DNB पदवी असणे आवश्यक आहे. तसेच Pharmacology, Chestitis किंवा Intensive Care या विषयातील डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र ठरू शकतात. संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना निवड प्रक्रियेत अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. तर कमाल वयोमर्यादा 58 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

advertisement

असा असेल पगार

निवड झालेल्या उमेद्वारांचा पगार हा त्यांच्या अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार ठरवण्यात येणार आहे. आयसीयु विभागात काम करण्यासाठी या भरतीद्वारे पात्र डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

'या' दिवशी होणार मुलाखत

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मुलाखतीसाठी 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 अशी असेल. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

advertisement

मुलाखतीचे ठिकाण कोणते?

या महापालिकेच्या होणाऱ्या मुलाखतीचे ठिकाण असेल ते म्हणजे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी आपला बायो-डाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्रे अशा सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ आणि झेरॉक्स प्रत घेऊन येणे गरजेचे आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ही संधी नका सोडू, बिजोत्पादनासाठी कांदा 700 रुपये क्विंटल, इथं करा खरेदी
सर्व पहा

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती एक उत्तम संधी आहे. इच्छुकांनी दिलेल्या तारखेत हजर राहून या संधीचा लाभ घ्यावा.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
PCMC Recruitment : थेट मुलाखतीतून नोकरीची संधी, पिंपरी चिंचवडमध्ये मेगा भरती, पात्रता काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल