Onion Seed Price : शेतकऱ्यांनो ही संधी नका सोडू, बिजोत्पादनासाठी कांदा 700 रुपये क्विंटल, इथं करा खरेदी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
बीज उत्पादनासाठी बियाणे उत्पादक कंपन्या प्रोत्साहन देत असतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे बीज उत्पादन घेतलं जातं.
जालना : हायब्रीड सीडसाठी जालना शहर प्रसिद्ध आहे. जालना जिल्ह्यातील तसेच आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना बीज उत्पादनासाठी बियाणे उत्पादक कंपन्या प्रोत्साहन देत असतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे बीज उत्पादन घेतलं जातं. सध्या बीज उत्पादनासाठी कांदा लागवडीचा हंगाम सुरू आहे. लोकल 18 च्या प्रतिनिधीने जालना बाजार समितीमधून लागवडीच्या कांद्याचे दर आणि आवक याबाबत आढावा घेतला, पाहुयात.
advertisement
जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 15 ते 20 ट्रक कांदा कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा दक्षिणेतील राज्यांमधून दाखल होत आहे. या कांद्याला गुणवत्तेनुसार 600 रुपये ते 1300 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बीज उत्पादनासाठी कांद्याची लागवड करत आहेत.
advertisement
कांद्याची विक्री सध्या हळूहळू सुरू असून जसजशी शेत खाली होतील तसतशी कांद्याची मागणी वाढेल. सध्या दररोज 15 ते 20 गाड्या कांद्याची विक्री होत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
advertisement
दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने यंदा जमिनीची भूजल पातळी उंचावली आहे. त्यामुळे जिल्हाभरात पाण्याची स्थिती चांगली असल्याने कांदा लागवड वाढण्याची शक्यता आहे. बाजारामध्ये कांद्याचे दर देखील माफक असल्याने शेतकऱ्यांचा कांदा खरेदीला चांगला प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळत आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 15, 2025 4:06 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Onion Seed Price : शेतकऱ्यांनो ही संधी नका सोडू, बिजोत्पादनासाठी कांदा 700 रुपये क्विंटल, इथं करा खरेदी

