जेवणाचे दर वाढणार
गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे केटरर्स आता मिळेल त्या किमतीत गॅस शोधत आहेत. काळ्या बाजारात गॅसचे भाव गगनाला भिडल्याने, अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी केटरर्सनी जेवणाच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटचे गणित पूर्णपणे बिघडले असून, अनेक कुटुंबे लग्नसोहळे पुढे ढकलण्याबाबत विचार करत आहेत.
advertisement
४५ हजार कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार
ही परिस्थिती केवळ लग्नसोहळ्यांपुरती मर्यादित नसून, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे ४५ हजार कामगारांच्या रोजगारावरही आता टांगती तलवार आहे. गॅस नसल्याने अनेक ठिकाणी लग्नकार्यासाठीच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत. आनंदाच्या या दिवसांत निर्माण झालेल्या या गॅससंकटाने पिंपरी-चिंचवडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
केटरिंग असोसिएशनने प्रशासनाला या तातडीच्या समस्येकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. जर लवकर पुरवठा सुरळीत झाला नाही, तर केवळ लग्नाचा आनंदच नाही, तर हजारो लोकांचा रोजगारही हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पुणेकर आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
