TRENDING:

सुमन लक्ष ठेवायची, पुण्यातील कुटुंब घराबाहेर गेली की घरात घुसून करायची मोठं कांड; 250 सीसीटीव्ही तपासताच खळबळ

Last Updated:

कुठे बाहेरगावी जाताना किंवा अगदी कामावर जातानाही आपल्यापैकी अनेकांनी घराची चावी घराबाहेरच एखाद्या कुंडीखाली किंवा चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवण्याची सवय असते. मात्र, याच सवयीचा फायदा घेऊन आता धक्कादायक कांड घडत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी : कुठे बाहेरगावी जाताना किंवा अगदी कामावर जातानाही आपल्यापैकी अनेकांनी घराची चावी घराबाहेरच एखाद्या कुंडीखाली किंवा चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवण्याची सवय असते. मात्र, याच सवयीचा फायदा घेऊन आता धक्कादायक कांड घडत आहेत. त्यामुळे, पुणेकरांनो, आता सावध व्हा. सांगवी परिसरात अशाच प्रकारे चावी शोधून घरफोडी करणाऱ्या एका सराईत महिलेला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल आठ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले असून, या महिलेच्या धक्कादायक कांडामुळे परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
घरात घुसून करायची चोरी (प्रतिकात्मक फोटो)
घरात घुसून करायची चोरी (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

250 सीसीटीव्ही फुटेजचा थरार

सांगवी पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने तपासाची चक्र फिरवली. घरफोडी करणाऱ्या आरोपीचा कोणताही माग नसताना पोलिसांनी सांगवी ते वारजे माळवाडी दरम्यानच्या मार्गावरील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तांत्रिक तपासादरम्यान एक महिला संशयास्पद हालचाली करताना दिसून आली.

advertisement

तपासात निष्पन्न झालं की, सुमन दत्ता लोंढे (वय ३५, रा. वारजे माळवाडी) ही महिला घराबाहेर जाणाऱ्या लोकांच्या घरावर लक्ष ठेवायची. घराला कुलूप लावून चावी घराबाहेर किंवा कुंडीत लपवून ठेवणाऱ्यांची ती खात्री करायची आणि संधी मिळताच घरात शिरून दागिने लंपास करायची. पोलिसांनी शिताफीने तिला वारजे माळवाडी परिसरातून तिला ताब्यात घेतलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

ही कामगिरी गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. या घटनेनंतर घराबाहेर चावी ठेवण्याची चूक किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय अनेकांना आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
सुमन लक्ष ठेवायची, पुण्यातील कुटुंब घराबाहेर गेली की घरात घुसून करायची मोठं कांड; 250 सीसीटीव्ही तपासताच खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल