समोर आलेल्या माहितीनुसार, फातिमा अमजद अख्तर (वय 35) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला गेल्या सात ते आठ वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहे. पण, ती मूळची बांग्लादेशातील असल्याची माहिती आहे. सुरुवातीला वैध व्हिसावर कामाच्या शोधात ती भारतात आली होती. महत्त्वाचे म्हणजे भोसरी परिसरात ‘माला विठ्ठल डावखर उर्फ फातिमा बेगम फईमुद्दीन’ या खोट्या नावाने ती स्थानिक कुटुंबांकडे घरकाम करत होती.
advertisement
कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाही
या काळात तिने लग्नही केलं. तिने कर्नाटकच्या एका युवकासोबत लग्न केलं आणि हे दोघंही भोसरीत एकत्र राहत होते लागले. आश्चर्य म्हणजे, तिच्या पतीला सुद्धा तिच्या बांग्लादेशी नागरिकत्वाबाबत आणि व्हिसाची मुदत संपल्याची माहिती असूनही त्याने ही बाब लपवून ठेवली होती. ATS ला या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली आणि फातिमाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत तिने आपली खरी ओळख मान्य केली असून, तिच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे आढळेली नाहीत.
कारवाईकडे डोळेझाक केली जात आहे का?
पुण्यात बांग्लादेशी घुसखोर मोठ्या संख्येने स्थायिक झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात गेल्या काही वर्षात हजारो बांग्लादेशी कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास आहेत. दरम्यान पोलिसांना विशेष शोध मोहीम राबविण्याचे आदेश असून त्यानंतर्गत बांगलादेशी घुसखोर शोधणे, त्याची ओळख पटवणे तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सर्वांचा तपास करणे अशा कामांना वेळ लागत असल्याने पोलिसांकडून या कारवाईकडे डोळेझाक केली जाते आहे का? असाच प्रश्न आता उपस्थित होतोय.
