नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, पीडित ३५ वर्षीय महिलेने आपल्या बहिणीला आणि तिच्या मुलाला कौटुंबिक वादामुळे स्वतःच्या घरी आश्रय दिला होता. मात्र, ही बाब बहिणीच्या पतीला (रा. पिंपळनेर, जि. बुलढाणा) आवडली नाही. "माझ्या पत्नीला आणि मुलाला तुझ्याकडे का ठेवले?" याच रागातून आरोपी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी पावणेआठच्या सुमारास देहू-आळंदी रस्त्यावरील मोशी येथे फिर्यादीच्या घरी पोहोचला.
advertisement
रॉडने प्रहार आणि लूटमार
आरोपीने वाद घालत लोखंडी रॉडने मेहुणीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रॉडचा वार जोरात लागल्याने महिलेच्या पायाला गंभीर दुखापत होऊन हाड फॅक्चर झालं. महिला वेदनेने विव्हळत असतानाच आरोपीने तिच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र आणि हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला.
या घटनेनंतर जखमी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपी पतीविरुद्ध मारहाण आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेला अशा प्रकारे मारहाण केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
