TRENDING:

Video: 33 खंड प्रकाशित, संशोधकांसाठी संधी, डेक्कन कॉलेजमध्ये जगातील सर्वात मोठी संस्कृत डिक्शनरी!

Last Updated:

आतापर्यंत 33 खंड प्रकाशित झाले असून एकूण 36 खंडांचा हा भव्य ग्रंथसंच लवकरच पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. दरवर्षी एक खंड प्रकाशित करण्याची परंपरा जपत हा प्रकल्प सातत्याने पुढे सरकत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : संस्कृत भाषेचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी आणि अभ्यासकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील संस्कृत आणि कोषशास्त्र विभाग येथे तयार करण्यात आलेली संस्कृत भाषेची जगातील सर्वात मोठी डिक्शनरी आज संशोधनविश्वात एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत आहे. 1948 साली या महत्त्वाकांक्षी संस्कृत शब्दकोश प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आणि गेली 75 वर्षांपेक्षा जास्त काळ हा प्रकल्प अखंडपणे सुरू आहे. या शब्दकोशामध्ये तब्बल 22 लाख शब्दांचा समावेश असून त्यासोबत 1 कोटीहून अधिक संदर्भ दिलेले आहेत. आतापर्यंत 33 खंड प्रकाशित झाले असून एकूण 36 खंडांचा हा भव्य ग्रंथसंच लवकरच पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. दरवर्षी एक खंड प्रकाशित करण्याची परंपरा जपत हा प्रकल्प सातत्याने पुढे सरकत आहे.
advertisement

प्रत्येक शब्दकोशाचा उद्देश वेगवेगळा असतो. काही शब्दकोश केवळ अर्थ स्पष्ट करण्यापुरते मर्यादित असतात मात्र डेक्कन कॉलेजचा हा संस्कृत शब्दकोश ऐतिहासिक दृष्टिकोनातून तयार करण्यात आला आहे. एखादा शब्द प्रथम कोणत्या ग्रंथात आढळतो, त्याचा अर्थ काळानुसार कसा बदलला, तो शब्द पुढील साहित्यपरंपरेत कसा वापरला गेला किंवा लुप्त झाला का याची सविस्तर नोंद या शब्दकोशात करण्यात आली आहे. त्यामुळे हा केवळ भाषेचा शब्दसंग्रह नसून संस्कृत भाषेच्या हजारो वर्षांच्या प्रवासाचा दस्तऐवज ठरतो.

advertisement

Fake Currency Racket: छ. संभाजीनगरच्या संतोषचं मोठं कांड, जालन्यात बनावट नोटांचा कारखाना, दृश्य पाहून सगळेच हादरले

भाषेचा इतिहास ज्या प्राचीन ग्रंथांपासून सुरू होतो, त्या वेदकालीन साहित्यापासून ते अलीकडच्या काळातील ग्रंथांपर्यंतच्या शब्दसंपदेचा अभ्यास करून हा कोष तयार करण्यात आला आहे. वेद, पुराण, काव्य, शास्त्र, नाट्य आणि विविध तत्त्वज्ञानपर ग्रंथांतील शब्दांचा अभ्यास करून त्यांचे संदर्भांसह संकलन करण्यात आले आहे. त्यामुळे प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा आणि ज्ञानपरंपरेचा अभ्यास करण्यासाठी हा शब्दकोश प्रमाणग्रंथ मानला जातो.

advertisement

या प्रकल्पाचे जनक S. M. Katre असून त्यांच्या दूरदृष्टीतून 1948 साली या उपक्रमाची पायाभरणी झाली. त्यानंतर अनेक संशोधक, अभ्यासक आणि संपादकांच्या अथक परिश्रमातून हा ग्रंथसंच विकसित झाला आहे. सध्या या प्रकल्पाचे कार्य पुढील पिढीचे विद्वान पुढे नेत आहेत. या संदर्भात माहिती देताना संस्कृत शब्दकोश प्रकल्प प्रधान संपादक आणि संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले की, हा शब्दकोश संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त असून ऐतिहासिक आणि भाषावैज्ञानिक अभ्यासासाठी तो मोठी संधी उपलब्ध करून देतो.

advertisement

मुद्रित स्वरूपाबरोबरच या शब्दकोशाचे डिजिटायझेशनही करण्यात आले आहे. कोषश्री पोर्टलच्या माध्यमातून संशोधक आणि अभ्यासकांना हा शब्दसंग्रह ऑनलाईन पाहता येतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध झाल्यामुळे जगभरातील संस्कृत अभ्यासकांना या अमूल्य ठेव्याचा लाभ घेता येत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
33 खंड प्रकाशित, संशोधकांसाठी संधी, डेक्कन कॉलेजमध्ये सर्वात मोठी संस्कृत डिक्शन
सर्व पहा

संस्कृत भाषेची समृद्ध परंपरा आणि तिचा ऐतिहासिक विकास समजून घेण्यासाठी हा शब्दकोश एक प्रभावी साधन ठरत आहे. शब्दांच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रवास उलगडणारा हा ग्रंथसंच केवळ पुण्याचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा शैक्षणिक अभिमान ठरला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Video: 33 खंड प्रकाशित, संशोधकांसाठी संधी, डेक्कन कॉलेजमध्ये जगातील सर्वात मोठी संस्कृत डिक्शनरी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल