मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट चौकातील या स्पा सेंटरमध्ये ही कारवाई केली गेली. इथे परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि बुधवारी (२५ मार्च) दुपारी या सेंटरवर छापा टाकला. या प्रकरणी स्पा चालक मयूर मोहिते (वय २६, रा. दिघी) आणि मॅनेजर अक्षय सुतार (वय २६, रा. निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
तीन महिन्यांत १७ महिलांची सुटका
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. आतापर्यंत ८ कारवायांमध्ये एकूण १७ महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर, २० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मागील तीन वर्षांत अशा प्रकारचे अवैध व्यवसाय करणाऱ्या २९ आस्थापनांना पोलिसांनी टाळे ठोकले आहे.
संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईनंतर आता मावळ तालुक्यातील स्पा सेंटरवरही अशीच धडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
