TRENDING:

PMP: बस पाससाठी रांगा लागणारच नाहीत! प्रवाशांसाठी अभिनव उपक्रमाची सुरुवात

Last Updated:

PMP: या उपक्रमामुळे प्रवाशांना पीएमपीच्या अधिकृत केंद्रावर किंवा मुख्य कार्यालयात जावे लागणार नाही. परिणामी वेळ आणि प्रवासाचा खर्च दोन्हींची बचत होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी एक अभिनव पाऊल उचलले आहे. पीएमपीकडून 'फिरते पास केंद्र' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, आता प्रवाशांना आपल्या परिसरातच पीएमपीचे मासिक पास सहज मिळू शकणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.
PMP: बस पाससाठी रांगा लागणारच नाहीत! प्रवाशांसाठी अभिनव उपक्रमाची सुरुवात
PMP: बस पाससाठी रांगा लागणारच नाहीत! प्रवाशांसाठी अभिनव उपक्रमाची सुरुवात
advertisement

सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील सहा ठिकाणी फिरते पास केंद्र दर सोमवारी ते शनिवारी सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 या वेळेत कार्यरत असणार आहे. या केंद्रांवर विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी मासिक पास काढण्याची सोय उपलब्ध असणार आहे. यासोबतच पुणे महानगरपालिकेच्या विविध अनुदानित पास योजनांची माहिती देखील या केंद्रांवर दिली जाणार आहे.

advertisement

या उपक्रमामुळे प्रवाशांना पीएमपीच्या अधिकृत केंद्रावर किंवा मुख्य कार्यालयात जावे लागणार नाही. परिणामी वेळ आणि प्रवासाचा खर्च दोन्हींची बचत होणार आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून क्यूआर कोड, पीओएस मशीन आणि रोख व्यवहाराद्वारेही पास खरेदी करता येणार आहे.

Pimpri Chinchwad: 19 लाख वाहने अन् प्रदूषित नद्या, पिंपरी चिंचवडला प्रदूषणाचा विळखा, धक्कादायक अहवाल समोर

advertisement

या फिरत्या केंद्रांवर पुणे दर्शन, पुणे पर्यटन बससेवा, आपली पीएमपीएमएल, मोबाइल अ‍ॅप, महिला विशेष बस सेवा, रातराणी सेवा यांसारख्या योजना आणि सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पीएमपीच्या विविध सेवा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. पुणे शहरात वाढत चाललेल्या लोकसंख्येला पालिकेच्या बससेवेचा लाभ मिळावा यासाठी पीएमपीकडून हे अभिनव पाऊल उचलण्यात आले आहे. भविष्यात या केंद्रांची संख्या वाढवण्याचा विचारही पीएमपी करत आहे.

advertisement

हा उपक्रम सुरू केल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, सेवा अधिक प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे. पीएमपीच्या या प्रयत्नाचे अनेकांकडून स्वागत होत आहे आणि भविष्यातही असेच प्रवासीभिमुख उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फिरत्या पास केंद्राचे वेळापत्रक:

सोमवार: एसएनडीटी कॉलेज (मेट्रो स्टेशन)

मंगळवार: कोंढवा गेट (एनडीए गेट सर्कल)

बुधवार: खडी मशीन चौक (के. जे. व जे. के. कॉलेज)

advertisement

गुरुवार: राधा चौक (बाणेर-बालेवाडी)

शुक्रवार: हिंजवडी गाव (शिवाजी चौक)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

शनिवार: आकुर्डी रेल्वे स्टेशन

मराठी बातम्या/पुणे/
PMP: बस पाससाठी रांगा लागणारच नाहीत! प्रवाशांसाठी अभिनव उपक्रमाची सुरुवात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल