नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी पुणे शहरात राज्यभरातून तसंच अगदी राज्याबाहेरील लाखो लोक वास्तव्यास आहेत. यामुळे विमान, रेल्वे किंवा खासगी वाहतुकीने रात्री उशिरा शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रात्रीच्या वेळी अनेकदा रिक्षाचालक प्रवाशांची गरज पाहून जास्त पैसे उकळत होते. तसंच महिला आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला होता.
advertisement
या पार्श्वभूमीवर, पीएमपीने अगोदरच सहा महत्त्वाच्या मार्गांवर 'रातराणी' बससेवा सुरू केली होती आणि तिला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर आता नागरिकांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने नुकतीच पुणे स्टेशन ते वाघोली मार्गावरही ही सेवा सुरू केली. ज्यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
पीएमटीची रातराणी सेवा सध्या खालील मार्गांवर उपलब्ध आहे:
कात्रज ते शिवाजीनगर बसस्थानक
कात्रज ते पुणे स्टेशन
हडपसर ते स्वारगेट
हडपसर ते पुणे स्टेशन
निगडी ते पुणे स्टेशन (वाकडेवाडी मार्गे)
पुणे स्टेशन ते एनडीए गेट 10
पुणे स्टेशन ते निगडी
आणि आता पुणे स्टेशन ते वाघोली
