वडील आणि आजोबांनंतर आईसुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकली असून पोलीस आता शिवानी अग्रवाल यांचा शोध घेत आहेत. ससून हॅास्पिटलमधील डॅाक्टरांवर दबाव टाकण्यासाठी शिवानी अग्रवाल ससून रूग्णालयात स्वतः हजर होती अशी सूत्रांची माहिती आहे. रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी चौकशी समितीने सरकारला अहवाल सादर केला. यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने ससूनचे अधिष्ठाचा डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं.
advertisement
भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या, धावत्या कारवर गोळीबाराचा थरार
रक्ताचे नमुने आईचे?
दरम्यान, ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने देत असताना तिथे दोघे नव्हे तर तिघेजण उपस्थित होते अशीही माहिती समोर आलीय. चौकशी अहवालात अल्पवयीनाच्या रक्ताचे नमुने बदलून तिथे एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेतल्याचं नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हे रक्ताचे नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचेच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आई शिवानी अग्रवाल यांचे रक्ताचे नमुने दिल्याचं समोर आलं तर त्यांनाही अटक केली जाऊ शकते.
अग्रवाल कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त
पुणे पोलिसांनी आता अग्रवाल कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त केले आहे. विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि त्यांचा मोठा मुलगा आणि अल्पवयीन आरोपीचा पासपोर्ट ही जप्त केला आहे. अपघात घडला तेव्हा शिवानी अग्रवाल या ससून हॉस्पिटलमध्ये हजर होत्या, अशी माहिती समोर आली आहे. तसंच त्यांनी डॉक्टरांवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे.
