भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या, धावत्या कारवर गोळीबाराचा थरार

Last Updated:

माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला.

News18
News18
जळगाव : भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करण्यात आलाय. बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास धावत्या गाडीवर गोळीबार केले गाला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला. यात दोघांनाही गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले होते. भुसावळ शहरातल्या जळगाव नाका मरी माता मंदिराजवळ ही घटना घडलीय. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने भुसावळ शहर हादरले आहे.
दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी केली. भूसावळ शहरात तणावाचे वातावरण असून घटनास्थळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या, धावत्या कारवर गोळीबाराचा थरार
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement