या आदेशानुसार गणेशोत्सवाच्या काळात 30 आणि 31 ऑगस्ट तसेच 1 ते 4 सप्टेंबर आणि 6 शिवाय 7 सप्टेंबर या सात दिवसांमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकांचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार आहे. याशिवाय नवरात्र उत्सवासाठी बुधवार एक ऑक्टोबर आणि गुरुवार 2 ऑक्टोबर, नाताळसाठी गुरुवार 25 डिसेंबर वर्षा अखेरीसाठी 31 डिसेंबर रोजी हे निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमासठीआवश्यकतेनुसार परवानगी देण्याचा अनुषंगाने एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
advertisement
ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 तसेच त्यातील सुधारित नियम 2017 मधील तरतुदीनुसार मर्यादित आवाजातच ध्वनिक्षेपकांचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. झोनिंगप्रमाणे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणे कडक बंदीचे आहे. ही सूट केवळ गणेशोत्सवाच्या काळापुरतीच लागू असेल आणि इतर शांतता क्षेत्रांत ध्वनिक्षेपकांचा वापर करता येणार नाही.
