पुणे: पुण्यात मागील काही दिवसांपासून गँगवारचा भडका उडाला आहे. आंदेकर आणि कोमकर टोळीमध्ये भडका उडाला आहे. अशातच कुख्यात गँगस्टर निलेश घायवळच्या टोळीने कोथरूडमध्ये गोळीबार करत एका जणावर कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी घायावळ टोळीवर मोक्का लावला आहे.
मागील आठवड्यात कोथरूडमध्ये घायावळ टोळीने एका व्यक्तीवर हल्लाा केला होता. चार आरोपींनी गोळीबार करत कोयत्याने वार केले होते. कोथरूड परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर कोथरूड पोलिसांनी या चार आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या चारही हल्लेखोरांची कसून चौकशी केली असता या सगळ्या प्रकरणी निलेश घायवळ आणि त्याच्या इतर साथीदारांचा थेट सहभाग असल्याचं उघड झालं आहे. आता पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
मागील आठवड्यात निलेश घायवळच्या टोळीतील चार जणांनी कोथरूड भागामध्ये एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केला होता. मध्यरात्री ही घटना घडली होती. प्रकाश धुमाळ यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता. गाडीला साईड दिली नाही या क्षुल्लक कारणातून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात प्रकाश धुमाळ जखमी झाले होते. त्यांना तातडीने पुण्यातील कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल केलं होतं. घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे या चौघांनी हा गोळीबार केला होता. धक्कादायक म्हणजे, गोळीबार झाला तेव्हा पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर होतं. चालत जायचं म्हटलं तर पोलीस स्टेशनपासून घटनास्थळ दोन मिनिटाच्या अंतरावर आहे. अंदाजे अंतर 200 मीटर आहे. पण स्थानिक नागरिकांनी सांगितलं की घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने पोलीस घटनेच्या ठिकाणी आले होते.