कसे असेल वेळापत्रक
या सेवेनुसार दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे विमानतळावरून विमान उड्डाण करेल. पुण्यातून विमान रात्री 8.50 वाजता उड्डाण होईल आणि अबू धाबी येथे रात्री 10.45 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात अबू धाबीहून विमान रात्री 11.45 वाजता निघेल आणि पहाटे 4.15 वाजता पुण्यात उतरेल.
सध्या पुणे विमानतळावरून दररोज बँकॉक आणि सिंगापूरसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी नियमित उड्डाणे सुरू आहेत. पुणेकर प्रवाशांमध्ये युरोप, यूएईसारख्या देशांमध्ये थेट विमानसेवा सुरु करण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे आता या नवीन विमानसेवेने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
advertisement
पुणे विमानतळाची धावपट्टी सध्या विस्तारीकरणाच्या टप्प्यात आहे. नवीन सुविधा पूर्ण झाल्यानंतर विमानांची संख्या आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे हळूहळू वाढवली जातील. एअर इंडिया एक्सप्रेसने आधी सिंगापूर आणि बँकॉकसाठी सेवाही सुरू केली होती आणि आता अबू धाबीचा समावेश केला आहे.
या नवीन उड्डाणामुळे पुणेकरांना अबू धाबीसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी थेट पोहोचण्याचा सोयीस्कर पर्याय मिळेल. प्रवासाच्या वेळापत्रकामुळे रात्री उड्डाण करून सकाळी परतीचा प्रवास पूर्ण होईल जे व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही प्रकारच्या प्रवाशांसाठी सोयीचे ठरेल.
