TRENDING:

बॅग चेकिंग सुरू असताना महिलाला फुटला घाम, चिप्सचे डबे उघडताच अधिकारी हैराण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Last Updated:

पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने बँकॉकहून आलेल्या महिलेकडून चिप्सच्या डब्यात लपवलेला ७२२ ग्रॅम, ७२.२ लाखांचा गांजा जप्त केला. तपास सुरू.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे: विमानतळावर बॅगांचं चेकिंग सुरू असताना अचानक महिलेला घाम फुटला. तिने लपवण्याचा प्रयत्न केला. पण चेकिंगदरम्यान पोलिसांच्या हातात अशी एक गोष्ट सापडली ते पाहून अधिकारी हैराण झाले. चिप्सच्या पाकिटातून चक्क बँकॉक ते पुणे गांजाची तस्करी सुरू होती.
फोटो सौजन्य- AI
फोटो सौजन्य- AI
advertisement

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. एका महिला प्रवाशाकडून तब्बल ७२ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा गांजा अत्यंत चलाखीने चिप्सच्या डब्यांमध्ये लपवण्यात आला होता. ही घटना विमानतळावर तस्करीच्या नवनवीन मार्गांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित करते.

बँकॉकहून आली 'ती' प्रवासी

advertisement

पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ६ डिसेंबर रोजी पुणे विमानतळावर ही कारवाई केली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या आय एक्स २४१ (IX 241) या विमानाने ही महिला प्रवासी थेट बँकॉकहून पुण्यात दाखल झाली होती. अधिकाऱ्यांनी काही संशयाच्या आधारावर या महिलेला थांबवून चौकशी सुरू केली. तिच्या सामानाची कसून तपासणी करणे आवश्यक होते.

advertisement

चिप्समध्ये लपवला होता गांजा

जेव्हा अधिकाऱ्यांनी महिलेच्या बॅगेची तपासणी सुरू केली, तेव्हा त्यांना काहीतरी वेगळे आढळले. बॅगेत ठेवलेल्या चिप्सच्या दोन डब्यांमध्ये हा गांजा मोठ्या शिताफीने लपवलेला होता. हा गांजा इतक्या चलाखीने लपवला होता की, सहज तपासणीत तो आढळणे शक्य नव्हते. परंतु, इंटेलिजन्स युनिटच्या सतर्कतेमुळे ही तस्करी उघडकीस आली.

७२२ ग्रॅम आणि ७२.२ लाखांची किंमत

advertisement

जप्त केलेल्या गांजाचे वजन करण्यात आले असता ते ७२२ ग्रॅम इतके भरले. आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित बाजारभावानुसार या गांजाची किंमत ७२.२ लाख रुपये इतकी मोठी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पुण्यात नेमका कशासाठी आणला जात होता आणि यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तहसीलदाराच्या टेबलावर पैशाचा पाऊस, जालन्यात खळबळ, नेमकं काय घडलं? Video
सर्व पहा

एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित महिलेवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेची कसून चौकशी करून या तस्करीच्या जाळ्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
बॅग चेकिंग सुरू असताना महिलाला फुटला घाम, चिप्सचे डबे उघडताच अधिकारी हैराण, पुण्यातील धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल