टप्पा क्रमांक चार अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी येथून स्पर्धेला सुरुवात होणार असून ती पुणे शहरहद्दीत जावून परत राजीव गांधी ब्रिजमार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणार करुन ती सागवी, वाकड, निगडी, त्रिवणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी काळेवाडी परिसरातून फिरुन परत राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत प्रवेश करणार आहे. ही स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडणेकरीता तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळणेकरिता स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असून वाहतूक पर्यायी मार्गान वळविण्यात आलेली आहे.
advertisement
शाळा दुपारी 12 वाजल्यानंतर बंद
विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरीता स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, चिंचवड एम.आय.डी.सी, चिखली, काळेवाडी, भोसरी एम.आय.डी.सी., यशवंतनगर पिपरी, त्रिवेणीनगर या परिसरातील सर्व शासकीय व खाजगी शाळा दुपारी 12 वाजेनंतर बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर
स्पर्धेचा चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आला असून त्याचे एकूण 58 कि.मी अंतर आहे. त्यामुळे पुणे शहरातील होणारी वाहतूक कोंडी तसेच बहुतेक शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आदेश जारी करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
