पुणे- बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्ग विकसीत करण्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठरवलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 699 किमीचा हा मार्ग असून महाराष्ट्रात त्याची लांबी 206 किमी इतकी असणार आहे. सहा पदरी रस्त्याचा हा प्रकल्प असून यामुळे पुणे- बेंगलोर महामार्गावर असणारा वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सहापदरी महामार्गाला अंदाजे 42 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय, रस्त्याच्या कामाला तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे. महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नव्या मार्गाच्या प्रकल्पाचा विचार केला जात आहे.
advertisement
एनएचआयने म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा ग्रीनफिल्ड महामार्ग विकसित करण्याचे निश्चित केले. नव्या ग्रीनफिल्ड महामार्गावर वाहने प्रतितास 120 किमी वेगाने धावणार असल्याचे बोलले जात आहे. 609 किमीच्या पुणे- बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्गामध्ये पुण्यातील नव्या रिंग रोडचाही समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. या रिंग रोडची सुरूवात पुण्यातल्या खोपीतून केली जाणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील उर्से ते सातारा रस्त्यावर असलेल्या केळवडे दरम्यानचा भाग पुणे रिंगरोडचा असेल. त्याचं काम एमएसआरडीसीच्या अखत्यारित केले जाणार आहे. ह्या रिंगरोडचा भाग पुणे- बेंगलोर नव्या ग्रीनफिल्ड महामार्गाचा भाग करण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
दरम्यान, पुण्याचा विकास दिवसेंदिवस अधिकाधिक वेगाने होताना दिसत आहे. पुणे शहराभोवती रिंग रोड साकारण्यात येणार असून त्यासोबतच पुणे- बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्ग विकसित केला जाणार आहे. त्यामुळे अविकसित क्षेत्रामधील आर्थिक विकासाला चालना मिळेल. या महामार्गावर पुणे- बेंगलोर शहराजवळ पाच किमी लांबीची तातडीचे इमर्जन्सी एअरस्ट्रिप (हेलीपॅड) तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे राज्य मार्ग आणि राष्ट्रीय मार्ग जवळच्या टोलिंग प्रणालीसह; तसेच ग्रेड सेपरेटेड इंटरचेंजसह जोडण्यात येतील. दरम्यान या सहापदरी प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ असणार असून वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे.
